
देवळा : प्रतिनिधी प्रशांत गिरासे- देवळा- (दि.१२ नोव्हेंबर) वाखारी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या डॉ. नूतनताई सुनील आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजने अंतर्गत गुंजाळ नगर ते सुभाष नगर रस्ता सुधारणा करणे या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर हे उपस्थित होते स्थानिक रहिवासी व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा व वर्दळीचा रस्ता असल्याने अनेक दिवसांपासूनची मागणी आज पूर्ण होत असल्याने उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला, यावेळी सि.के. आबा गुंजाळ, डॉ. राजेंद्र गुंजाळ, बापू गुंजाळ, पोलीस पाटील योगेश गुंजाळ, दसरथ पुरकर, भोला आहेर, गोरख गुंजाळ, सोनू जाधव, चंद्रकांत पगार, उत्तम पगार, बापू निकम, सतीश जाधव, बाजीराव गुंजाळ, सतीश गांगुर्डे, सुरेश गांगुर्डे, लहानु जाधव, सिताराम गुंजाळ, रवी पवार, प्रवीण गुंजाळ, अलका गुंजाळ, प्रमिला गुंजाळ, ज्योत्स्ना गुंजाळ, ग्राम विकास अधिकारी पुनम सोनजे, जयश्री निकम आदी उपस्थित होते.
