कपिल तेलुरे यांची नांदगाव निवडणूक पक्ष निरीक्षक म्हणून निवड

0

नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल – नांदगाव येथील आर पी आय आठवले गटाच्या नांदगाव निवडणूक पक्ष निरीक्षक म्हणून कपिल तेलुरे यांची निवडनांदगाव शहरातील सन 2021 – 2023 वर्षातील स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, पंचायत समित्या निवडणुका कामी आरपीआय आठवले गटाचे
जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या आदेशानुसार खामगाव शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांची महत्वाची बैठक घेऊन पत्रकार परिषदेचे आयोजन नांदगाव येथील सारनाथ बुद्धविहार येथे घेण्यात आली.
त्यावेळी आरपीआयचे ज्येष्ठ नेते शंकरराव काकळीज यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले तर नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष देविदास आण्णा मोरे, नांदगाव तालुका अध्यक्ष राजाभाऊ पवार यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.तसेच नांदगाव तालुका महिला अध्यक्ष सौ संगीता वाघ, नांदगाव महिला शहराध्यक्ष सौ संध्या अहिरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महामानवाला वंदन करण्यात आले.नाशिक जिल्ह्यातील आरपीआय जेष्ठ नेते शंकर भाऊ काकडे यांनी मागील झालेला निर्णय चुकीचा असल्याचा व दिशाभूल झाला असल्याचे स्पष्ट केले व सर्वांच्या उपस्थितीत नांदगाव शहरातील जे पदाधिकारी आहेत तेच पदाधिकारी राहतील निवडणूका झाल्यानंतरच साहेबांच्या आदेशानुसार नवीन नियुक्ती केली जाईल तसेच आरपीआयचे नांदगाव शहराध्यक्ष महावीर जाधव हेच पुन्हा p त्याच पदावर दावेदार आहेत असे त्यांनी l सर्वांच्या समोर बैठकीमध्ये सांगितले. व हेच असतील असे काकळीज यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सर्वांच्या उपस्थितीत सांगितले.
रामदासजी आठवले साहेबांशी मी स्वतः चर्चा करून फक्त नाशिक जिल्ह्यातील भाजपा पक्ष आपला मित्र पक्षाला विश्‍वासात घेत नसल्याचे शंकराव काकळीज यांनी स्पष्ट केले असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तसेच नांदगाव निवडणूक पक्ष निरीक्षक पदी कपिल तेलुरे यांची नियुक्ती झाल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेचे शंकराव काकळीज, देवीदास मोरे, राजाभाऊ पवार, दादाजी महाले, संजय पवार कांतीलाल मोरे, रमेश पवार, कपिल तेलुरे, गौतम काकडे, संगीता वाघ, सौ संध्या अहिरे आदी उपस्थित होते.बैठक यशस्वीतेसाठी गौतम काकडे शहराध्यक्ष, प्रशांत गरुड शहर संपर्क प्रमुख, दीपक मोरे शहराध्यक्ष, जफर भाई शेख अल्पसंख्यांक शहराध्यक्ष, सोमनाथ चौधरी नांदगाव शहर संघटक, प्रवीण इघे शहर संघटक प्रमोद पगारे सहसचिव,विलास लोखंडे, किरण पवार दिनेश जाधव आदी मान्यवर व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here