पनवेल तालुक्यातील नवीन पनवेल येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालय उद्दघाटन सोहळा संपन्न

0

मुंबई : गुरूवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी पनवेल तालुक्यातील नवीन पनवेल येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालय उद्दघाटन सोहळा व नवीन पनवेल शहरातील बहुजन समाज पार्टीचे पनवेल तालुकाध्यक्ष शंकर सोनवले यांच्यासह १०० पदाधिकाऱ्यांचा भव्य दिव्य असा पक्ष प्रवेश सोहळा शिवसेना नेते व संपर्क नेते कोंकण विभाग तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री मा.ना.श्री. सुभाषजी देसाई साहेब व मावळ लोकसभा खासदर मा.श्री. श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.सदर कार्यक्रमाचे आयोजक तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, उपमहानगर प्रमुख यतीन देशमुख, यांच्या मार्फत करण्यात आले.यावेळी बोलताना शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की, एमआयडीसी परिसरातील गावांचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. लोकांची कामे करणारे शिवसैनिक आम्ही आहोत. पनवेल महानगरपालिकेने उद्यानांवर कोटींच्या घरात टेंडर काढत आहेत. आणि आपल्या ठेकेदारांचे भले करून मनमानी करत आहेत. शिवसेना शाखा उद्घाटन सोहळ्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, आज शिवसेनेची शाखा उद्घाटन सुरू झाली नाही तर ते मंदिर आहे. आणि जनतेने या मंदिरात आपल्या अडचणी सांगितल्यानंतर त्या मंदिरातील पुजाऱ्याने त्या अडचणी सोडविण्यासाठीचे हे मंदिर जनतेनेच असणार आहे.या कार्यक्रमास रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, रमेश गुडेकर, महिला रायगड जिल्हासंघटिक सौ.रेखाताई ठाकरे, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका संघटक भरत पाटील, ग्रामीण तालुका संघटक रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, पनवेल ग्रामीण तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, महानगर संघटक प्रथमेश सोमण, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, उपतालुक प्रमुख बबन फडके, विष्णू लहाने, शांताराम कुंभारकर, नरेश पाटील, योगेश ढोपरी, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, रामदास गोंधळी, कैलास पाटील, प्रभाकर गोवारी, शिवसेना उत्तर भारतीय सेल तालुका अध्यक्ष सी.पि. प्रजपती, शहर समन्वयक गिरीश धुमाळ, नवीन पनवेल शहर प्रमुख रुपेश ठोंबरे, कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, कलंबोली शहर प्रमुख डी.एन. मिश्रा, तळोजा शहर प्रमुख प्रदीप केणी, खारघर शहर प्रमुख प्रकाश गायकवाड, ग्रामीण विभाग प्रमुख दत्ता फडके, प्रमोद पाटील, धनराज बडे, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ. कल्पना पाटील, विधानसभा संघटिका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटिका सौ. सुजाता सौ. अनीता डांगरकर, महानगर संघटिका सौ.शुभांगी शेलार, उपतालुका संघटिका टिया धुमाळ, उपमहानगर संघटिका सौ.रीना पाटील, संचिता राजे, शहर संघटिका सौ. अपूर्वा प्रभू, अर्चना कुलकर्णी मीना सदरे, नंदा चेडे, युवासेनेचे उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, तालुका अधिकारी केवल माळी, उत्तर भारतीय सेल उपमहानगर अध्यक्ष सत्यनारायण शर्मा,शहर अध्यक्ष जयप्रकाश जयस्वाल,राजनाथ पासवान,विनोद सिंह,प्रयाग शाह,उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, युवासेना व युवतीसेना पदाधिकारी तसेच महिला आघाडी व शिवसैनिक तसेच नवीन पनवेल येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here