ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व नाशिक रोड तर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या (एस.टी.) आंदोलनास नैतिक पाठिंबा जाहीर

0

मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व नाशिक रोड तर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या (एस.टी.) आंदोलनास नैतिक पाठिंबा जाहीर केला.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने मनमाड येथील एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपाच्या ठिकाणी जाऊन भेट घेतली.यावेळी छोटेखानी सभेत झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे (नाशिक), मनमाड कारखाना शाखा चे संघटक सचिव सचिन इंगळे, मनमाड कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य शरद झोंबाड यांची भाषणे झाली.शिष्टमंडळात झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे, झोनल कार्यकारिणी सदस्य
सुचित्रा गांगुर्डे, विजय भाऊ गेडाम, नाशिक रोड अतिरिक्त मंडळ चे कार्याध्यक्ष समिर सालवे, मनमाड कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, नाशिक रोड कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव अवीनाश कटारे, नाशिक रोड कारखाना शाखा चे खजिनदार दीपाली पाडंव मनमाड कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य राहुल शिंदे, विनोद खरे, अर्जुन बागुल,अनील जगताप,हरीष जाधव,जे एस पवार,ए पी गायकवाड,अनील चोपडे,शीवपाल युईके,
दीपक धीवर,नीलेश रोकडे,अमोल कलाणे,दीनेश दामोर,कीरण गागुर्डे,दीलीप दुधगम आदीचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here