विशेष प्रयत्नाने शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश

0

मुंबई : सोमवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व युवसेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री मा. आदित्य ठाकरे साहेब यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन,तसेच शिवसेना मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड पनवेल मा.श्री.शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली, खारघर शहरातील उद्योजक, व्यापारी , चार्टर्ड अकाऊंटंट (CA) तसेच शेकडो महिला व पुरुषांचा उपमहानगर प्रमूख दिपक घरत, खारघर शहरप्रमुख शंकरशेठ ठाकूर व शाखा प्रमुख अनिल तळवणेकर यांच्या विशेष प्रयत्नाने शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.खासदार श्रीरंग आप्पा बारणे साहेबांनी या वेळी संगितले की शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्रातील सर्व व्यापारी व कामगारांना समान न्याय करतात व हा पक्ष शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे त्यामुळे या पक्षात आपण सर्वांना सन्मान मिळेल तसेच येणाऱ्या पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष हा इतर पक्षापेक्षा चांगले काम करेल हे निश्चित आहे.त्याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, उपजिल्हा संघटक परेश पाटील, तालुका संघटक भरत पाटील , विधानसभा संघटक दिपक निकम, पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, तालुका प्रमुख पनवेल ग्रामीण विभाग ज्ञानेश्वर बडे, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, यतीन देशमुख, शहर समन्वयक गिरीश धुमाळ, उपशहर प्रमुख प्रकाश गायकवाड, सूर्यकांत म्हसकर, विभाग प्रमुख आकाश शेलार, शाखा प्रमुख सचिन ठाकुर, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ. कल्पना पाटील, विधानसभा संघटिका सौ. रेवती सकपाळ, उपमहानगर संघटिका सौ. रीना पाटील, उपमहानगर संघटिका मंदा जंगले, पनवेल विधानसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी, युवसेना पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिवसेना युवासेना,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here