परेलच्या दामोदर हॉल मध्ये रंगणार रंगकर्मींचा यल्गार…जल्लोष महाराष्ट्राचा.

0

मुंबई : कोरोना काळात सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणासाठी बंदी घालण्यात आल्याने कलाक्षेत्रावर अवलंबून असलेल्या रंगकर्मींची उपासमार सुरु झाली होती. नियमित कामे सुरू व्हावीत यांसाठी सरकार दरबारी अनेकांनी निवेदने सुद्धा दिली पण हे क्षेत्र सुरु करण्याबाबत कोणताही असा ठोस निर्णय शासनाकडून घेतला जात नव्हता. रंगकर्मींं असंघटित असल्याने शासन दरबारी आवाज पोहोचविणे सहज शक्य नव्हते. रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्रने ते शक्य केले रंगकर्मींची एकजूट झाली, न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एक चळवळ उभी राहिली, रंगकर्मीं आंदोलनाची दखल शासनाला घ्यावी लागली रंगकर्मीनी १४ मागण्यांचे निवेदन दिले होते त्यातील बहुतेक मागण्यांना शासन दरबारी मान्यता मिळाली आणि २२ ऑक्टोबर २०२१ पासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाच्या याच निर्णयाला अनुसरून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी महाराष्ट्रातील रंगकर्मीं आपापल्या जिल्ह्यात कार्यक्रम सादर करणार आहेत. आणि याचेच पडसाद म्हणुन मुंबईत येत्या २२ ऑक्टोबर २०२१ रोजी, दामोदर नाट्यगृह, परेल येथे संध्याकाळी ७ वाजता जल्लोष महाराष्ट्राचा हा कार्यक्रम रंगकर्मीं आंदोलन महाराष्ट्र तर्फे सादर होणार आहे. रंगकर्मींं आंदोलन हे केवळ महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींमुळेच यशस्वी झाले. याप्रसंगी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हांला आंदोलनासाठी सर्वतोपरी सहकार्य केले त्यांचा सत्कार देखील आम्ही या कार्यक्रमात करणार आहोत असे आवाहन प्रसिद्धी पत्रकांतून केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here