मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ : औरंगाबाद – सिल्लोड : ईद – ए – मिलाद निमित्त महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खुलताबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीनंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथील जरजरी बक्ष दर्गाला भेट दिली. यावेळी दर्गा कमिटीच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित गोयल, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, उपअभियंता मिलिंद नाकाडे, रोशन महाजन, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाटे, नगराध्यक्ष ऍड. सय्यद मुकोनुद्दीन , सिल्लोड चे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती कुशोर बलांडे, पोलीस निरीक्षक सीताराम म्हेत्रे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, सिल्लोड नॅशनल सुत गिरणीचे संचालक शेख आमेर अब्दुल सत्तार, सतीश ताठे, दर्गा अध्यक्ष फजिलत अहेमद ईसाक, माजी नगराध्यक्ष ऍड. कैसरोद्दीन , सलीम कुरेशी, दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरपोद्दीन महंमद रमजाने, नगरसेवक मूनुउद्दीन मुजिबोद्दीन, अब्दुल हाफिज रशीद, मो. नईम मो. बक्ष आदींची उपस्थिती होती.