सोहम आयोजित राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा (NTSE) परीक्षेची तयारी विशेष मार्गदर्शन मा. जय गायकवाड मा. गौरव कुळकर्णी

0

मुंबई : स्वप्न ती नव्हेत जी झोपल्यावर पडतात, स्वप्न ती की जी तुम्हाला झोपूच देत नाहीत.अशा या स्वप्नांना आकार देणारी सत्यात उतरवणारी माणसे असतात आणि त्यांचे मार्गदर्शन एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे कायमच मोलाचे असते. डॉ. मीनल जी भोळे संचलित सोहम कला गुणगौरव अकादमी मुंबई आयोजित ‘ *राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा ‘(NTSE)* तयारी, विशेष मार्गदर्शन या परीक्षेविषयी वेबिनार मध्ये कुमार गौरव कुळकर्णी व कुमार जय गायकवाड या गुरू-शिष्य द्वयींच्या माध्यमातून या परीक्षा कशा घेतल्या जातात ? या परीक्षांचा अभ्यासक्रम कसा असतो? या परीक्षेला किती गुण असतात? विद्यार्थी व पालकांचा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन या आणि अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून *NTSE* परीक्षेचे अंतरंग उलगडत गेले.
स्पर्धा परीक्षांचे जग हे विद्यार्थ्यांना नेहमीच खुणावत असते. मग त्यासाठी इच्छा, आत्मविश्वास ,ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, महत्वाकांक्षा ही पंचसूत्री जर अवलंबली तर आपण ध्येय निश्चितच साध्य करू शकतो. त्याचबरोबर या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती बद्दल देखील जय व गौरव सर यांनी अचूक मार्गदर्शन केले.मुळातच मीनल मॅडमनी या वेबिनार चे आयोजन NTSE परीक्षेची माहिती व्हावी,विद्यार्थ्यांचा परिक्षेकडे जाण्याचा कल वाढावा तसेच पालकांना सुद्धा या परीक्षेची सखोल माहिती मिळावी म्हणून केले होते.
या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीमती प्रिया उपासनी यांनी केले असून त्यांना श्रीमती समीक्षा तावडे व श्रीयुत दीपक निचित यांचे सहकार्य लाभले .तर तंत्रस्नेही गायत्री मेहेत्रे यांचे विशेष योगदान लाभले.या कार्यक्रमाला समुपदेशक मा. शैलजा मुळे मॅडम,नेरूळच्या विद्याभवन शाळेचे संचालक मा. दिनेश मिसाळ सर यांनी उस्फूर्त प्रतिक्रिया दिल्या.भरभरून आशीर्वाद दिले.भविष्यात या विद्यार्थ्यांनी IAS सारख्या परीक्षांमधून यशस्वी होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशी इच्छा प्रकट केली. विद्यार्थ्यांनी या वेबिनारला उस्फुर्त प्रतिसाद देऊन प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सोहम अकादमीने नेहमी नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचा ध्यास घेत अनेक सुप्रसिद्ध कलाकार ,वक्ते यासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करीत त्यांचे इतर विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन उपलब्ध करून दिले अश्या शब्दात सोहम अकादमीच्या कार्याचा मान्यवरांनी गौरव केला.विद्यार्थ्यांनी, पालकांनी ,शिक्षकांनी असे महत्त्वपूर्ण वेबिनार आयोजित केल्याबद्दल सोहम अकादमीचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here