विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था – अ.भा.म.चि.नि. महामंडळाचा अनोखा उपक्रम.

0

मुंबई : विजयादशमी च्या शुभमुहूर्तावर संपन्न झालेल्या सदस्यीय स्नेह संमेलनात नवीन उपक्रम राबवून ते सन्मार्गी लावू असा विश्वास संपादन करून अध्यक्ष देवेंद्र मोरे यांनी सर्व संचालक मंडळाला दिलासा दिला. याप्रसंगी खजिनदार राजू शेवाळे, उपाध्यक्ष बाळासाहेब गोरे, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, चिटणीस राजेंद्र बोडारे, मनिष व्हटकर, सुरेश सोनावणे आदी सभासद उपस्थित होते. मोरे यांनी सांगितले की मराठी चित्रपट निर्मात्यांच्या निगराणीखाली पारदर्शीपणे संपूर्ण महाराष्ट्रात किमान १२० व अधिक थिएटर्समध्ये मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याकरीता अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाने स्वतंत्रपणे वितरण व्यवस्था (distribution) दसर्‍याच्या शुभ मुहुर्तावर सुरु केली आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रातील मराठी चित्रपट निर्मात्यांनी घ्यावा. तसेच त्याबाबत काही अडचणी आल्या तर खालील कार्यालयात:आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ वितरण विभाग, २/७ मोहन नाईक को.ऑप.हाैसिंग सोसा.लि.व्ही.वाय.दहिवलकरबुवा मार्ग,
नायगाव,दादर -४०००१४. संपर्क : – ८७७९१२४४७३
व्हटसप :- ९५९४८४८२९० email :- abmcnm12@gmail.com संपर्क साधावा असे आवाहनही केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here