ई कचऱ्याच्या संकलनासाठी मनपा ने कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी – नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांचे आवाहन

0

मुंबई : जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७:- पुणे: रोटरी क्लब ऑफ टिळक रोड च्या वतीने राष्ट्रीय स्वच्छता दिवसाच्या निमित्ताने ताथवडे उद्यान येथे ई कचरा संकलन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या संकलन मोहिमेस प्रचंड प्रतिसाद मिळाला व अवघ्या 4 तासात 3 टेंपो भरून सामान संकलित झाले. शिक्षण समिती अध्यक्ष नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, स्वच्छ संस्था यांच्या सहकार्याने आयोजित ई कचरा संकलन मोहिमेचे उदघाटन रोटरी क्लब ऑफ टिळक रोड च्या अध्यक्ष अपर्णा क्षीरसागर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मकरंद कुलकर्णी, चारुदत्त भावे, स्वच्छच्या दिपश्री खराडे पाटील इ मान्यवर उपस्थित होते.या भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल च्या चालू अथवा बंद टाकवू वस्तू,जुने कपडे, भांडी, खेळणी, जुने फर्निचर, पादत्राणे, पुस्तकं इ ह्या संकलन उपक्रमात आणून दिल्या. कधीही संकलन मोहीम आयोजित केली की नागरिक मोठ्या प्रमाणावर त्यास प्रतिसाद देतात याचाच अर्थ ही सामान्यांची गरज असून अडगळीच्या वस्तू कुठे टाकाव्यात हा नागरिकांपुढे प्रश्न पडतो असे नगरसेविका व शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.यासाठी पुणे मनपा ने कायमस्वरूपी संकलन केंद्र उभारावेत असे आवाहन करतानाच यासाठी मी प्रस्ताव सादर करेन असेही सौ. खर्डेकर म्हणाल्या. दिवाळी पूर्वी नागरिक घराची साफ सफाई करतात त्यावेळी सर्वत्र अशी मोहीम राबविण्यात येईल असेही सौ. खर्डेकर यांनी स्पष्ट केले. या कचऱ्यातील वापरण्याजोग्या वस्तू ह्या कचरावेचकातील गरजूना देण्यात येतात तर अन्य वस्तू स्वच्छ संस्थेतर्फे रिसायकलिंग साठी दिल्या जातात असे रोटरीचे मकरंद कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच यातील वापरण्याजोग्या वस्तू स्वच्छच्या मॉल मधे किरकोळ मोबदल्यात गरजूना देण्यात येतात असेही कुलकर्णी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here