मनमाड : ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ चे संघटक सचिव सचिनभाऊ इंगळे व कार्यकारिणी सदस्य किरण वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व बहुजन युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला.झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम करण्यात आला.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सचिन इंगळे व किरण वाघ यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट मनमाड चे सचिव संदीप धिवर, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन सागर गरूड यांनी केले.
यावेळी संदिप धिवर,शरद झोंबाड, पंढरीनाथ पठारे, कल्याण धिवर, सत्कारमूर्ती सचिन इंगळे व किरण वाघ यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य फकिरा सोनवणे, विनोद खरे, प्रेमदिप खडताळे, राहुल शिंदे आदी ने केले.







