बैल पोळा साधेपणाने साजरा

0

सिल्लोड : प्रतिनिधी विनोद हिंगमिरे- मागील व या वर्षी कोरोना संकटाच्या सावलीत बैल पोळा सण साजरा करण्यात आला. केळगाव येथे यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलाची पुजा घरीच करुन साजरा केला.पोळ्यात गर्दी होऊ नये या उद्देशाने मातीच्या बैलाची पुजा करत तोरण सोडण्यात आले.असा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन हजारो वर्षांपासून आपल्यासाठी शेतात काम करुन राबणा-या बैलाचा सण पोळा हा सण साधेपणाने साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपआपले बैलाच्या शिंगाला,अंगाला रंग व गळ्यात,पायात घुंगरू घागरमाळा बांधुन सजवत बैलाची पुजा करुन पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आपल्याच घरी खाऊ घातले.बैलाना गावात न मिरवता आपल्याच घरी बांधुन ठेवले होते.अशा साधेपणात बैल पोळ्याचा सण साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here