केळगाव परिसरात केळणा नदीला पूर 3तास वाहतुक ठप्प झाली

0

सिल्लोड प्रतिनिधी/ विनोद हिंगमीरे :-सिल्लोड तालुक्यातील केळगाव,आधरवाडी,कोल्हाळा तांडा,पावसाने पासून या पावसात केळगाव येथील केळणा नदीला पूर आल्याने दोन्ही बाजुन तीन तास वाहतुक ठप्प होती पुलाची उंची कमी असल्याने वाहतुक ठप्प झाली होती.प्रशासनाने पुलाची उंची लवकरात लवकर पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रांमस्थानी केली आहे या पावसामुळे वाहनधारक जीव धोक्यात घालून कोल्हापुरीवरुन जाताना दिसत आहे.या नदीला पुर आल्याने तीन तास वाहतुक ठप्प झाली होते तर सध्यांकाळी वाहतुक सुरळीत झाली होती.वाहचालकांना 3तास थांबावे लागले लहान मुलांना सुध्दा तास न तास थांबावे लागले.हा पुल कमी उंचीचा असल्याने या पुलावरुन पाणी सुरु होते पुर आल्यानंतर वाहतुक ठप्प होती.व.केळगाव आमठाणा मार्गावरील वाहतुक तीन तास ठप्प झाली होती.प्रवाशाना अडचणीचा सामना करावा लागला.मुडैश्वर येथे भार्वीक पर्यटक येत असल्यामुळे अनेक भाविंकाना या पुराच्या पाण्यामुळे वाटेतुनच परत जावे लागत असते यामुळे शेतकरीवर्गाच्या हा पुल झालाच पाहिजे.अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.भाविकानी मुडैश्वर येथे दर्शनासाठी गर्दी केली होती मात्र केळगाव येथील पुलाची उंची कमी असल्याने भाविकाना केळणा नदिवर तीन तास थांबावे लागले भाविकांची चांगलीच दैना झाली होती, केळगाव परिसरात आमठाण येथे मिरची बाजारपेठ असल्यामुळे या परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना नदीला पूर आल्यामुळे नुकसानीचा सामना करावा लागला या करिता बांधकाम विभागाने या कडे द्यावे अशी मागणी गावकरी व वाहनधारकांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here