एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ अंतर्गत सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये तिसऱ्या तिमाहीतील गरोदर महिलांसाठी संपन्न झाला आॕनलाईन सीबीई कार्यक्रम

0

नाशिक 👉राष्ट्रीय पोषण महिना सप्टेंबर २०२१ या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.. मंगळवार दिनांक ७/९/२०२१ रोजी प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रांमध्ये कार्यक्षेत्रातील “तिसऱ्या तिमाहीतील गरोदर महिलांसाठी प्रसुतीनंतर १ तासाचे आत स्तनपान” या विषयावर आॕनलाईन सीबीई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..यात अंगणवाडी सेविकांनी या विषयावर व्हिडीओ तयार करुन, व्हाट्सअपवर गरोदर महिला लाभार्थींना पाठविले होते..तर काही ठिकाणी व्हिडीओ काॕल, व्हाट्सअप काॕल, झुम लिंकद्वारे हा कार्यक्रम संपन्न्न झाला.. तसेच यावेळी गर्भवती महिलांसाठी पोषक आहाराबाबत घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते..गर्भवती महिला व स्तनदा मातांसाठी कोविड लसिकरणाबाबत जनजागृती करण्यात आली..या आॕनलाईन CBE कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविकांना सुज्ञा खरे, पुष्पा वाघ, मयुरी महिरे, शितल गायकवाड या मुख्यसेविका यांनी व शितल ठुबे या गट समन्वयक यांनी मार्गदर्शन केले….सही पोषण..देश रोशन..🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here