शिवसेना मनमाड शहराच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख,नांदगाव विधानसभा लोकप्रिय शिवसेना आमदार, विकासपुरुष मा.श्री. सुहास आण्णा कांदे यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी जल्लोषात साजरा

0

शिवसेना मनमाड शहराच्या वतीने शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख,नांदगाव विधानसभा लोकप्रिय शिवसेना आमदार, विकासपुरुष मा.श्री. सुहास आण्णा कांदे यांचा वाढदिवसानिमित्त मनमाड उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना मोफत केस पेपर शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. दिवसभर रुग्णांना केसपेपर मोफत ठेवण्यात आले होते.कार्यक्रमाचे आयोजन शहरउपप्रमुख दिनेश घुगे व रुग्णकल्याण समिती यांच्या तर्फे करण्यात आले. तसेच शिवसेना मनमाड शहर शाखेतर्फे मनमाड उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना फळ वाटप शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, प्रवीण धाकराव, अज्जूभाई शेख आदींच्या हस्ते देण्यात आले. अजुभाई शेख यांच्या वतीने भगतसिंग मैदान येथील मुलींच्या मदरसा मध्ये अत्यावश्यक किराणा किट वाटप शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहरप्रमुख अमीनभाई पटेल यांच्या हस्ते देण्यात आले.मनमाड गुरुद्वारा साहिब येथे आमदार मा.श्री.सुहास आण्णा कांदे यांच्या दिर्घआयुष्यासाठी गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजीतसिह यांच्या हस्ते आण्णासाहेबांच्या समृद्ध दीर्घायुष्यासाठी “अरदास पठणाचा” कार्यक्रम करून प्रसाद वाटप केले गेले. कार्यक्रमाचे आयोजन तालुका संघटक संजय कटारिया यांनी केले.कॅम्प नं १ शिवसेना विभागातर्फे कॅम्प येथील बालसुधारगृह (रिमांडहोम) येथील मुलांना मिठाई,खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. तसेच कॅम्प नं २ शिवसेना विभाग यांच्या तर्फे करुणा कैअर सेंटर,चर्च येथील रुग्णांना सकस आहार वाटप केले. यांचे आयोजन शहरसंघटक मिलिंद पाथरकर, लोकेश साबळे यांनी केले. वरील सर्व कार्यक्रमांना शिवसेना मा. जिल्हाप्रमुख अल्ताफ खान, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयूर बोरसे, जेष्ठ शिवसैनिक रमेश आण्णा हिरण, सलीमभाई सोनावाला ता. संघटक संजय कटारिया, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, प्रवीण धाकराव, वाल्मिक आंधळे, परेश राऊत, मुकुंद झालटे, दिनेश घुगे, युवासेना शहरप्रमुख अमीन पटेल, अंकुश गवळी, नगरसेवक लियाकत शेख, जितू शिंदे, हर्षल भाबड, शहर संघटक बाळासाहेब माळवतकर, महेंद्र गरुड, मिलिंद पाथरकर, लोकेश साबळे, पिंटूभाऊ उगले, मुराद शेख, विशालभाऊ सुरवसे, अज्जूभाई शेख, ललित रसाळ, सिद्धार्थ छाजेड, आकाश पराशर, राकेश ताठे, राजाभाऊ तगारे, प्रशांत बनसोडे, विलासभाऊ भावसार, सुभाषभाऊ वाघ, ईश्वर पाटील, आकीब शेख, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर नांदगाव येथील आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार, अभिष्टचिंतन करून त्यांच्या हस्ते केक कापुन मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here