
मुंबई : साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे (एडूको) एक महत्त्वाचे मूल्य म्हणजे पर्यावरणपूरक पद्धतीने सण साजरे करणे. या वर्षी, पालक आणि समाजातील सदस्यांना गणेशाची सजावट करण्यासाठी पर्यावरणपूरक संसाधनांचा वापर करून या उपक्रमात सहभागी होण्यासाठी एज्युको आपणास आमंत्रित करत आहे.या अनोख्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी, आणि २० सर्वोत्तम सजावटांपैकी एक होण्यासाठी, सहभागींना पर्यावरणास अनुकूल सामग्री वापरून गणरायास सजवावे लागतील. सजावटीसाठी एक खास सूचना म्हणजे पर्यावरणास अनुकूल सामग्री उदा. बांबू, सुतळ , गवत आणि दोरी आणि पुनर्वापर केलेले साहित्य जसे पुठ्ठा यांचा उपयोग करणे.सर्व सहभागींनी खालील लिंकवर १० सप्टेंबर २०२१ पर्यंत व्हिडिओ (४५ सेकंदांपेक्षा अधिक नसावा), फोटो, सामग्री अपलोड करावे हि विनंती. यापैकी, सर्वोत्तम २१ पर्यावरणास अनुकूल गणेशाच्या सजावटी निवडल्या जातील आणि निवडलेल्या सर्वोत्तम स्पर्धकांना दिनांक २५ सप्टेंबर २०२१ रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र दिले जातील.
Link:https://fb.me/e/1bx5Ij8bb( धन्यवाद
साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूल (एडुको)
९०८२२९३८६७
