
नाशिक : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी (नाशिक) २ मोरवाडीगांव अंगणवाडी केंद्र क्र. १० च्या कार्यक्षेत्रात राष्ट्रीय पोषण महिना १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविला जाणार आहे..याकालावधीत सॕम बालकांच्या वजनवाढीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत..यात अमायलेज युक्त पिठाची पाककृती पालकांना समजावून सांगितली जाणार आहे..पालकांना त्याचे प्रात्यक्षिकही करुन दाखवीले जाणार आहे..या पिठाचा बालकांचे रोजच्या प्रत्येक आहारात एक चमचा समावेश केल्यास बालकांच्या वजनात वाढ होणार आहे..ही पाककृती तयार करतांना अख्खे गहू, अख्खे मुग, नाचणी (रागी) तांदूळ, सोयाबीन (८ महिने पूर्ण झालेल्या बालकांसाठी) भोपळ्याच्या बिया,काळे तिळ, यांचा वापर केला जाणार आहे..सॕम बालकांच्या पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष (सीबीई) समुदाय आधारीत कार्यक्रमाचे आयोजन लसिकरणाच्या दिवशी अंगणवाडी केंद्रात केले जाणार आहे..सॕम बालकांच्या वजनात वाढ व्हावी यासाठी मुख्यसेविका सुज्ञा खरे,आरोग्यसेविका पूजा गोवर्धने, आशासेविका प्रणाली राजपूत, अंगणवाडीसेविका शितल बावीस्कर व अंगणवाडी मदतनिस जिजाबाई मोरे या प्रयत्न करत आहेत.
