एकात्मिक बाल विकास सेवा योजना नाशिक (नागरी) २ प्रकल्पात राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर २०२१ मध्ये जनजागृतीसाठी केला जातो आहे, सोशल मिडियाचा वापर

0

नाशिक : एकात्मिक बाल विकास सेवा योजना नाशिक (नागरी) २ प्रकल्पात राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर २०२१ मध्ये जनजागृतीसाठी केला जातो आहे.. सोशल मिडियाचा वापर👉एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक २ प्रकल्पात १ सप्टेंबर २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना राबविला जात आहे..कुपोषण छोड पोषण की ओर..थामे क्षेत्रीय भोजन की डोर..हे ब्रिद घेऊन ४ थीमवर कामकाज केले जात आहे..१) यात पोषण वाटीका तयार करणे.२) पोषणा करिता योग व आयुष.३) पोषण साधनसामुग्रीचे वाटप/पोष्टीक पाककृतीचा वापर वाढविणे..४) सॕम बालके व पौष्टिक आहार..या थीमचे माध्यमातून जनजागृतीसाठी अंगणवाडीताई व मदतनिसताई या मेहनत घेवून स्वतः व्हिडीओ तयार करत आहेत..यात सर्व श्रीमती..अन्नपूर्णा अडसुळे, पुष्पा वडजे, सुहासिनी कसोटे, किर्ती पाचपांडे, पद्मा निरभवणे, सविता तायडे, कुसुम कासव, वंदना हिवाळे, अलका लोखंडे, भारती पवार, सविता धात्रक, संगिता भामरे, उज्वला खाडे, प्रभा दौंडकर, कल्पना जाधव,राजश्री निकम, सीमा भावसार, सरोजनी भालेराव, प्रतिभा उगलमुगले, मोहिनी इप्पर या अंगणवाडीताई विविध वेशभूषा साकारुन जन जागृतीचे व्हिडिओ तयार करुन व्हाट्सअपचे माध्यमातून लोकांपर्यंत पोषणाचे वर्तनात बदल घडविणेसाठी पोहोचवत आहेत..याकामी अंगणवाडी सेविकांना शितल गायकवाड व पुष्पा वाघ या मुख्यसेविकांचे मार्गदर्शन लाभत आहे….चला तर मग आपण सर्व मिळून सक्षम महिला, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध होऊया..🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here