अंगणवाडीत सुरु झाला पोषण माह २०२१ कोरोनाचे सर्व नियम पाळून सोशल मिडीयाचे माध्यमातून करणार प्रभावी जनजागृती

0

नाशिक : अंगणवाडीत सुरु झाला पोषण माह २०२१ कोरोनाचे सर्व नियम पाळून सोशल मिडीयाचे माध्यमातून करणार प्रभावी जनजागृती*.
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (नागरी ) नाशिक -२ ,नाशिक अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडीताई व मदतनिसताई यांनी भगुर,नाशिक,येवला,मनमाड येथे पोषण माह(१ ते३० सप्टेंबर )२०२१ ची सुरुवात कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करुन विविध कार्यक्रम घेवुन “माझे मुल माझी जबाबदारी” हा उद्देश समोर ठेवुन केली. पुढील सप्टेंबर महिनाभर विविध थीमच्या माध्यमातुन जनजागृती केली जाणार आहे.. पोषण अभियानाचे उद्दीष्टे साध्य करण्यासाठी कुपोषण निर्मुलनाबाबत,आरोग्य शिक्षणाविषयीचे संदेश लोकांपर्यन्त पोहचवीण्यासाठी एक टिम म्हणून कोरोनाचे पार्श्वभूमीवर सोशल मिडियाचा वापर करुन अंगणवाडीताई व मदतनिसताईंनी स्वतः तयार केलेले व्हिडिओ संदेश लाभार्थी, पालक व जनतेपर्यंत पोहोचवून जनजागृती केली जाणार आहे.. पोषण अभियान हे जनतेचे आंदोलन व्हावे..तसेच ही एक लोक चळवळ व्हावी..यामाध्यमातून सक्षम माता, सुदृढ बालक, सुपोषित महाराष्ट्र घडावा…हाच प्रयत्न केला जाणार आहे. .मोठ्या मेहनतीने तसेच सकारात्मक विचार करुन लाभार्थी सर्वोच्च हित डोळ्यासमोर ठेवुन ही टिम सज्ज झाली आहे…. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लाँकडाऊनच्या काळातही ह्या टिमने प्रकल्प अधिकारी अजय फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोषण माह आणि पोषण पधंरवडा यशस्वीरीत्या साजरा केला होता..तसेच आजही ही टिम व्हाट्सअप गृपचे माध्यमातून ३ ते ६ वयोगटातील लाभार्थींना पूर्वप्राथमिक शिक्षण सक्षमपणे देते आहे.. यावेळीही या टिमने सोशल मिडियाचा प्रभावी उपयोग केला होता..ह्या पोषण माहमध्ये जनतेचा सक्रीय सहभाग घेवुन त्यांच्या पोषणाचे वर्तनात बदल घडवुन सर्व बाबी समजावुन सांगुन चांगल्या पोषणाची सवय लावणे हाच प्रयत्न राहणार आहे….यासाठी ” कुपोषण छोड, पोषण की ओर..थामे क्षेत्रीय भोजन की डोर” यामाध्यमातून पोषण वाटीका तयार करणे, पोषणाकरीता योग व आयुष, पोषण साधनसामुग्रीचे वाटप/पोष्टीक पाककृतीचा वापर वाढविणे,सॕम बालके व पोष्टीक आहार या थीमावर काम केले जाणार आहे..तसे दैनंदिन वेळापत्रकही अंगणवाडीताईंना देण्यात आलेले आहे..या कामी त्यांना सुज्ञा खरे, मयुरी महिरे, पुष्पा वाघ, शितल गायकवाड या मुख्यसेविका व शितल ठुबे गट,समन्वयक यांचे मार्गदर्शन लाभत आहे…सही पोषण ..देश रोशन …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here