नगर ची प्रतिक्षा गर्जे प्रथमच ” फरफट ” या मराठी सिनेमात झळकणार.

0

प्रतिनिधी-औरंगाबाद:  तेजस मेघा फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत मेघा डोळस निर्मित आणि महेश्वर तेटांबे दिग्दर्शित “फरफट ” या सामाजिक मराठी सिनेमाचे चित्रिकरण नुकतेच औरंगाबाद येथील गणोरी गावांत पार पडलं. फरफट ” या सिनेमाची कथा -पटकथा -संवाद लेखन मेघा डोळस यांचे असून सिनेमाच्या दिग्दर्शनाची सर्वतोपरी जबाबदारी महेश्वर तेटांबे यांनी पेलली असून त्यांनी या सिनेमाला न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. संगीतकार अतुल-राहुल यांनी नवोदित गीतकार विशाल आडबाल यांच्या गीतांना स्वरबद्ध केलं असून छायाचित्रण आणि संकलन ह्या जमेच्या दोनही बाजू विनायक जंगम यांनी सांभाळल्या आहेत. संदीप रावजी यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणुन काम केले आहे तर नाना जाधव यांनी रंगभूषाकार म्हणुन आपली भूमिका चोख पाडली आहे. यांत नगरची प्रतिक्षा गर्जे प्रथमच या सिनेमात झळकणार असून तिचे महाराष्ट्रात कौतुक होत आहे. ही कथा आहे एका मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील वडिलांचे छत्र हरविलेल्या गतिमंद मुलाचा प्रगतीच्या दृष्टीने सर्वांगीण विकास व्हावा त्यासाठी आईची होणारी तळमळ त्यातूनही ती सावरत असताना तीची होणारी फरफट आणि त्यातून तीला काय मार्ग सापडतो ? मुलामध्ये सर्वांगीण बदल होतो की नाही ? हे ” फरफट ” या चित्रपटात मांडले आहे. या सिनेमात आईची प्रमुख मध्यवर्ती भूमिका मेघा डोळस यांनी साकारली असून यातील प्रमुख कलाकार संदीप रावजी, साक्षी नाईक, विशाल आडबाल, चंद्रकांत काळे, अक्षदा मोरे, कविता गायकवाड, विद्या गायकवाड, सिद्धेश लिंगायत, संतोष तांदळे, भाऊसाहेब उबाळे, यशवंत मुसळे, गुरुनाथ तिरपणकर, प्रमोद दळवी, राहुल शेजुल, प्रतिक्षा गर्जे, अण्णासाहेब (पप्पु) तांदळे, दादासाहेब जाधव आदी गणोरी ग्रामस्थांनी यांत सहभाग घेतला आहे. निर्मिती व्यवस्था महेंद्र तुपे यांनी पाहिली असून लवकरच ” फरफट ” हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल असा विश्वास निर्माती मेघा डोळस यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here