देवळा ‘ भारतीय मानवाधिकार परिषदेच्या देवळा तालुका उपाध्यक्षपदी मेशी येथील पत्रकार विशाल पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शेख राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संतोष धात्रक शरद केदारे यांच्या आदेशाने ही निवड झाली आहे.महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वाल्मीक केदारे यांच्या हस्ते पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी नाशिक जिल्हा अध्यक्ष शिवाजी सोनवणे, देवळा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल मराठे, भारतीय मानवाधिकार परिषदेचे देवळा शहराध्यक्ष हेमराज पगारे, महिला तालुकाध्यक्ष रितू निरभवणे, पत्रकार एकनाथ सावळा,वैभव केदारे आदी, उपस्थित होते.पाटील यांच्या निवडीने देवळा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. परिसरातून देखील त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे,