लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे : साहीत्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या ५२ व्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने सिल्लोड शहरातील टिळकनगर येथील सामाजिक सभागृहामध्ये करण्यात आले होते.यावेळी मानवहीत लोकशाही पक्षाचे सिल्लोड तालुका संपर्क प्रमूख सखाराम आहिरे यांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सखाराम आहीरे यांनी आण्णाभाऊंच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकतांना सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊंच्या साहित्याचा साठा फार मोठा आहे.कथा,कादंबऱ्या,नाटके, अशी बरीच पुस्तके त्यांनी लिहून ठेवलेली आहेत.अण्णाभाऊंनी शिवरायांचा संदेश पोवाड्याच्या माध्यमातून जगाबाहेर पोहोचवला म्हणून लोकांनी त्यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली.आण्णाभाऊ साठे हे साहित्यसम्राटच नाहीतर ते थोर समाजसुधारक देखील होते. आणि अशा थोर,देशभक्त, समाजसेवक,साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे १८ जुलै १९६९ रोजी गोरेगाव मुंबई येथे अन्न न मिळाल्याने उपासमारीमुळे दुःखद निधन झाले ही महाराष्ट्रासाठी खेदाची बाब आहे. आण्णाभाऊ साठे रशियाला समजले परंतु भारताला नाही. आजही आण्णाभाऊ साठेंचे कुटुंबीय व सकल मातंग समाज लोकशाहीर आण्णाभाऊ साठेंना भारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या मागणीसाठी भारत सरकारकडे मागणी करत आहे,परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करतांना दिसत असल्याबाबतस खाराम आहिरे यांनी खंत व्यक्त केली.यावेळी मानवहीत लोकशाही पक्षाचे औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे,युवा तालुका अध्यक्ष फकीरचंद तांबे, तालुका अध्यक्ष नानासाहेब गायकवाड,तालुका उपाध्यक्ष बाबुराव आहिरे,महीला तालुका अध्यक्षा रामलीला जाधव,रतन अंभोरे,रमेश आहीरे,ज्ञानेश्वर आहीरे,भगवान सोनवणे,विष्णू सोनवणे,साहेबराव सोनवणे,रवी महाले,दिपक महाले,विठ्ठल कांबळे,संजय मोरे यांच्यासह मानवहीत लोकशाही पक्षाचे पदाधिकारी व सामाजबांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here