राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ची देवळा येथे आढावा बैठक

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे,मो.9130040024
देवळा दि.१७ जुलै- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांचा संवाद दौरा सुरू असून ते नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले असताना देवळा येथे शरद पवार पतसंस्थेत त्यांनी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष नंदन भास्करे उपस्थित होते, बैठकीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे देवळा तालुका अध्यक्ष सुनील आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिलीप आहेर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गोटू शिंदे, नामदार जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष कल्पेश आहेर, सुशांत गुंजाळ, धनंजय बोरसे, शाहरुख पटेल, रईस पटेल, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष सनी आहेर, सामाजिक कार्यकर्ते मनोज गुजरी, मयूर सोनवणे, अतुल जाधव, विजय हिरे, मुन्ना जाधव, गोरख जाधव अधिक कार्यकर्ते उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here