सिल्लोड तालुक्यांतील पशुधन पर्यवेक्षक,पशुसेवक संपावर,जनावराची उपचारा अभावी हेळसांड

0

सिल्लोड-प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषदेच्या वतीने दुग्धव्यवसाय व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविकाधारक (खाजगी पशुसेवक)यांना अन्यायकारक वागणूक देत असल्याने त्यांच्या विरोधात एल्गार पुकारुन पशुसेवकांनी दि.15 जुलै पासुन बेमुदत संप पुकारल्यामुळे पशुपालकाच्या मुक्या जनावरांवर वेळेवर उपचार होत नसल्याने उपचारा अभावी जनावरांची हेळसांड होत असून जनावर दगावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालल्यामुळे शेतकरीवर्गात गंभीर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पशुसंवर्धन आयुक्तांनी पशुवैद्यक परिषद 1984 च्या कायद्याप्रमाणे त्यांना पशुवैद्यकीय सेवा देण्यास निर्बंध घातले असुन याच बरोबर पशुधन पर्यवेक्षक (खाजगी पशुसेवकांवर) कारवाहीचा बडगा उगारल्याने दि.16 शुक्रवार रोजी शिवसेना भवन सिल्लोड येथे तालुक्यांतील 70 पशुसेवकाच्यावतीने आमदार तथा महसुल ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना
निवेदन देण्यात आले असून लवकरच सर्व पशुधन पर्यवेक्षक यांना न्याय मिळवून देण्यात येईल असे आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळेस सांगितले.यावेळी
अध्यक्ष रामनाथ भोजने,उपाध्यक्ष सुनील खराडे,सचिव चंद्रकांत दांडगे,सदस्य लक्ष्मण खंबाट,राहुल जगताप,सारंगधर वाडेकर,अनिस बेग,संदिप पाटील,कृष्णा जैवळ,शैलेंद्र साळवे,रामभाऊ भावले,मनोहर गोरे,शरद जाधव,एकनाथ हिवाळे,साळुबा खिल्लारे,स्वप्नील बोर्डे,कैलास आरके,शुभम पंडीत,गणेश राकडेसह एकुण 70 पशुसेवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here