देवळाने गावातील माध्यमिक विद्यालय शाळेत कोरोना प्रादुर्भावापासून बचावकार्यासाठी चांगल्या प्रकारचे मास्क वाटप.

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे- देवळाने गावातील कल्पना विद्याप्रसारक माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल शासन निर्णयानुसार 8 वी. ते 10 वी. चे वर्ग सुरू करण्यात येत असून तसेच शाळा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी आरोग्य अधिकारी सचिन मोरे यांनी शाळेच्या व्यवस्थापन समितीला भेट देऊन शाळेच्या विद्यार्थ्यांनी साठी चांगल्या प्रकारचे मास्क सुरक्षित अंतर व वेळोवेळी हात धुणे असे चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन केले व त्या विषयाला अनुसरून शाळेच्या पहिल्या दिवशी आज दिनांक 15 जुलै रोजी सकाळी माध्यमिक विद्यालय शाळेत या तिन्ही वर्गातल्या 200 विद्यार्थ्यांना महाराणा प्रताप क्रांती दलाचे तालुका कार्य अध्यक्ष व माध्यमिक विद्यालय समितीचे उपाध्यक्ष भावसिंग बाबूलाल पवार यांनी कोरोना प्रादुर्भावापासून बचावकार्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक एम व्ही कुवर सर व शाळेचे शिक्षक वृंद व कर्मचारी यांच्या समवेत विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे मास्क वाटप केले.या मास्क वाटप प्रसंगी देवळाणे ग्रामपंचायत सरपंच केदा शिरसाट, माजी सरपंच. दत्तू पवार व सदस्य. जंगलु कुवर, प्रभाकर पवार, भाऊसाहेब शिरसाट, ऋषिकेश घोडे, बापू फटांगडे, तंटामुक्ती अध्यक्ष. युवराज वाघ, व ग्रामस्थ. महेंद्र महाले, भिका ढोमसे, लोटन गोंदे, गोकुळ पवार, इत्यादी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here