चारठाणा ( प्रभाकर कुर्हे चारठाणकर ) कोरोना माहामारिच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षापासून शाळा बंद केल्याने शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे हि गंभीर बाब लक्षात घेता जिल्हा परिषद सदस्या मिनाताई राऊत यांनी शिक्षण अधिकारी डाॅ. सुचिता पाटेकर यांच्या उपस्थितीत चारठाणा सह केंद्रातील केंद्र प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक व पालक समिती यांची बैठकिचे आयोजन करुन चारठाणा सर्कल मधिल शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हिवरे बाजार पोपटराव पवार यांनी पुढाकार घेऊन कोविड चे सर्व नियम पाळून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला याच धरतीवर सर्कल मधील शाळा सुरू करण्याचा प्रयत्न आहे कार्यक्रमाच्या आध्यस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ.मीनाताई राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण अधिकारी डॉ सुचिता पाटेकर , ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस नानासाहेब राऊत, यांच्या सह सरपंच,उपसरपंच,विस्तार अधिकारी,पत्रकार ,केद्र प्रमुख मुख्याध्यापक शिक्षक व पालक समितीचे पदाधीकारी सर्व क्षेत्रातील कर्मचारी,मान्यवर यांची उपस्थीती होती मोठ्याप्रमाणावर होती.