
मनमाड : ३०जुन रोजी वर्कशॉप मधून सेवानिवृत्त होत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांचा सत्कार ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण आहिरे विजय गेडाम, कारखाना शाखा चे अति.सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे माजी सचिव अशोक गरुड़ कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा चे कार्यकारिणी सदस्य दिपक अस्वले, फकिरा सोनवणे व त्या त्या शॉप मधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.प्रत्येक शॉप मध्ये जाऊन खालील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.(१) चंद्रहास दाभाडे,(२) अशोक आव्हाड, (३)सुभाष वाघ, (४)भाऊराव गायकवाड,(५) साहेबराव बंडु,(६)बाळु गोविंद आदी कर्मचारी सेवानिवृत्त झाले.
प्रत्येक शॉप मधील वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे,बबनराव कसबे, सुभाष खरे,युवराज साळवे, अर्जुन बागुल , प्रशांत निकम, किरण आहीरे, हर्षद सुर्यवंशी, संदिप आहीरे,प्रेमदिप खडताळे, राहुल शिंदे, नवनाथ जगताप आदी केले.
