सेवली येये रिचार्ज शाप्ट च्या कामासाठी आ.लोणीकरांनी केला 25 लाखाचा निधी मंजुर ज्ञानेश्वर शेजुळ यांनी केले कामाचे उद्घाटन.

0

जालना {प्रतिनिधी}. विनोद हिंगमिरे: नानाजी देशमुख कृषि संजिवनी योजने अंतर्गत आज जालना तालुक्पातील सेवली येथे रिचार्ज शाॅफ्ट च्या कामाचा शुभारंभ करण्यात आला असुन या कामासाठी मा.मंत्री,आमदार बबनराव लोणीकर यांनी 25 लाख रुपयाचा निधी मंजुर करुन दिला आहे.व या कामासाठी भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुलभैय्या लोणीकर यांनी विशेष प्रयत्न केले असुन आज भा.ज.पा.चे जालना जिल्हाउपाध्यक्ष, ज्ञानेश्वर {माऊली} शेजुळ यांनी या कामाचे उद्घाटन केले आहे.यावेळी ज्ञानेश्वर शेजुळ म्हणाले कि रिचार्ज शाॅफ्ट च्या अॅक्टिविटीमुळे नाल्याच्या मध्येभागी सिमेंट नाल्याजवळ बोअर घेउन त्यामध्ये दगड,विटा,वाळु भरुन त्या बोअरचे पुनर्भरण केले जाणार असुन त्यामुळे पावसाळ्यात व नाल्यात पाणी असेपर्यंत या बोअरचे पुनर्भरण होणार आहे.त्यामुळे आसपासच्या परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होणार असल्याची सविस्तर माहिती ज्ञानेश्वर शेजुळ यांनी यावेळी उपस्थितांना दिली.यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्षा श्रीमती जिजाबाई जाधव,सरपंच शे.नविदभाई, उपसरपंच श्रीमती निलाबाई खंदारे,दिलीप जोशी,मा.सरपंच राजु देशमुख,शिवराज तळेकर,विकास पालवे,,समाधान वाघमारे,प्रमोद भालेकर,ग्रा.पं.सदस्य,ज्ञानेश्वर झोरे,गणेश झोरे,सौरभ माहोरकर,अजिम पटेल,अदिलपठाण,सचिन साकला,खाजा कुरेशी,कृषी सहाय्यक श्री आनंद भुतेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.या कार्यक्रमादरम्यान कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे नियम पाळण्यात आले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here