मनमाड येथे महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

0

मनमाड I प्रतिनिधी: कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आणि शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांच्या आदेशाप्रमाणे क्रांतिसुर्य ,जगतज्योती, लिंगायत धर्म प्रसारक व प्रचारक महात्मा बसवेश्वर यांची ८९० वी जयंती शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात आले .लिंगायत समाज बांधव हे आपापल्या घरात मोठ्या उत्साहाने महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली. येथील नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार मुंढे याच्यां मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे अधिकारी यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहांमध्ये महात्मा बसेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. या प्रसंगी शहरातील लिंगायत समाजाचे गोविंद लिंगायत, कैलास वाडकर ,मनोज जंगम ,अशोक बिदरी, दिलीप सुरडे ,हर्षद कोरपे , नितिन गुळवे, सुनिल, वाडकर,संतोष चुनुके, प्रशांत तक्ते, करण वाडकर उपस्थित होते याप्रसंगी शोशल डिस्टन्स पालन करून जयंती साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here