महिला बाल विकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांनी अंगणवाडीताई चे भरभरून केले कौतुक

0

नाशिक – महिला व बाल विकास मंत्री महोदया मा. नामदार अॕड. यशोमतीताई ठाकूर यांनी आज सखी वन स्टॉप सेंटर नाशिक जिल्हा महिला बाल कल्याण विभाग या ठिकाणी भेट दिली.बालविकास प्रक्रल्प नागरी नाशिक-2 , प्रकल्पाच्या वतीने मुख्यसेविका ज्योती सोनवणे मॅडम, पुष्पा वाघ मॅडम अंगणवाडी ताई पुष्पा वडजे,ज्योती चौधरी, पल्लवी साळी व अडसूळे यांनी उपस्थित राहुन त्यांचे स्वागत केले,आपण लॉकडाऊन मध्ये केलेल्या जनजागृती चे व्हिडिओ ,सर्वेक्षण,पुर्व शालेय शिक्षणाचे व्हिडिओ आदी काम महोदया समोर पेनड्राईव्ह द्वारे सादर केले. मा.मंत्री महोदया यांनी अंगणवाडी ताईच्या पोषण अभियानातील सातत्यपूर्ण कामाचे भरभरून कौतुक केले.हि आपल्या प्रकल्पासाठी अभिमानस्पद बाब आहे,माझ्या अंगणवाडी ताई सी.डी.पी.ओ. च्या पदा पर्यंत पोहोचावी असे उदगार त्यांनी यावेळी काढले.आज आपण करत असलेल्या कामाचे प्रत्यक्ष कौतुक होताना पाहिले.या सर्वांचे श्रेय आपले बाल विकास प्रकल्प अधिकारी मा. अजय रमेशराव फडोळ सर यांना जाते,चांगले काम करण्याची त्यांनी सवय आपल्या अंगीकृत आणली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here