वासोळ : प्रतिनिधी प्रशांत गिरासे देवळा-खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्राला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर व जिल्हा परिषद सदस्या सौ नूतनताई आहेर यांनी शनिवार दि.८मे रोजी भेट देऊन पाहणी केली यावेळी सुनील आहेर व नूतन आहेर यांनी नागरिकांशी चर्चा करून उपस्थित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांच्यात समन्वय साधत स्वतः जातीने लक्ष देत नागरिकांचे लसीकरण करून घेतले. सुरुवातीला प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध असताना शासन व प्रशासन लसीकरणाचे आवाहन करीत होते परंतु नागरिक अनामिक भीतीने लसीकरनास पुढे येत नव्हते प्रशासनातील अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी यांनी योग्य समुपदेशन केल्याने नागरिक लसीकरनास प्राधान्य देऊ लागल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे शासन ही लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे टप्प्याटप्प्याने लस उपलब्ध होऊन प्रत्येक नागरिकास लस मिळेलच त्यामुळे चिंतित न होता कोरोना चा वाढता संसर्ग रोखण्यासाठी एकमेव उपाय लसीकरण असल्याने सर्वांनी घाबरून न जाता सुरक्षित अंतराचे पालन करून गर्दी न करता लसीकरण करून घ्यावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सुनील आहेर यांनी केले यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.अलका सपकाळे, आरोग्य सेविका अनिता सानप, आरोग्य सेवक पाठक, प्रयोगशाळा तज्ञ दीपक जाधव, सामाजिक कार्यकर्ते समाधान देवरे आदी उपस्थित होते.