जनजागृती सेवा समितीच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती उत्साहात संपन्न

0

बदलापुर-घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती कोविड १९च्या नियमानुसार अंजलीनगर, बदलापुर(पश्चिम)येथे मर्यादित प्रमुख पाहुणे व मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. प्रारंभी संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र समन्वयक डाॅ.अमितकुमार गोविलकर, कोल्हापुर जिल्हा उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष जयवंत दादा दळवी, बदलापुर शहर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पतंगराव, मुंबई महानगरपालिका निवृत्त अधिकारी दीपक सरवदे,सिटीझन वेलफेअर असोशिएशनचे सल्लागार कीशोर गुरव या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले,डाॅ.अमितकुमार गोविलकर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.उपस्थित पाहुण्यांनी व मान्यवरांनी बाबासाहेबांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जनजागृती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, कार्यकारिणी सदस्य दीपक वांयगणकर, एकनाथ गायकर यांनी प्रमुख पाहुण्यांना”सन्मानपत्र “व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सर्वच प्रमुख पाहुण्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन शैली बाबत व त्यांच्या महान कार्याबद्दल प्रेरणादायी व उदभोदक विचार मांडले.गुरुनाथ तिरपणकर यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाला राजेंद्र नरसाळे, दीनेश भालेकर,मंगेश सावंत, चंद्रकांत पाटील, गोपाळ मुनगुटकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ गंधाली तिरपणकर, विराज जाळगावकर, दत्ता कडुलकर यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कार्यकारिणी सदस्य दीपक वांयगणकर यांनी केले व आभार प्रदर्शन कार्यकारिणी सदस्य एकनाथ गायकर यांनी मानले.अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here