पुंडलिक नगर पोलीसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना पकडले

0

औरंगाबाद  प्रतिनिधी विनोद हिंगमिरे : पुंडलिक नगर पोलीसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना पकडले “. काल दुपारी पासुन गोपणीय पद्धतीने सापळा लावून ही कारवाई आज सकाळी पहाटे पर्यंत सुरु होती यामधे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री घनश्याम बाबासाहेब सोनवणे साहेब व अन्न व औषध प्रशासन विभागाचे श्री राजगोपाल मुलचंंद बजाज यांनी फिर्याद दिली आहे व पुढील तपास हा PSI श्री रावसाहेब मुळे हे करत आहेत ,”सविस्तर माहिती गोपणीय माहीतीच्या आधारे बनावट ग्राहक एका पंटर ला पाठवले असता काल दुपारी” एक रेमडेसिवीर इंजेक्शन साठी रुपये 15,000 हजार देण्यात आले ,व नंतर पार संध्याकाळी 10:30ते 11:00 वाजे दरम्यान इंजेक्शन मिळाले ,नंतर पोलीसांनी विश्वासात घेऊन विचारले असता अजुन दोन जण असे तिघांना तपासासाठी घेतले असता तीन रेमडेसिवीर इंजेक्शन व तिनं मोबाईल अशी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे व विवीध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे 1) मंदार अनंत भालेराव वय 29 वर्ष राहणार 12 वी योजना शिवाजी नगर 2) अभिजित नामदेव तौर वय 33 वर्ष होती अपार्टमेंट सहयोग नगर,फॅलट 7 नंबर 3) अनिल अंबादास बोहते वय 40 वर्ष राहणार मौर्या मंगल कार्यालय परिसर यातील एक जण हा घाटी मधे नोकरीस असल्याची माहिती कळते आहे माननीय पोलीस आयुक्त श्री डाॅ निखील गुप्ता साहेब यांचे मार्गदर्शनाखाली , सहाय्यक पोलीस आयुक्त झोन 2 चे श्री दिपक गिऱ्हे साहेब अपी श्री घनश्याम सोनवणे साहेब,अन्न व औषध प्रशासन विभागाचे श्री राजगोपाल बजाज साहेब सह PSI रावसाहेब मुळे साहेब,PSI श्री विकास खटके साहेब,रमेश सांगळू,बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड,विलास डोईफोडे,दिपक जाधव,राजेश यदमळ,अजय कांबळे,प्रविण मुळे सर्वांनी परिश्रम घेतले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here