दक्षता हीच सुरक्षा” यां वेब मालिकेच्या पोस्टरचा अनावरण सोहळा संपन्न.

0

मुंबई – सध्या कोरोनाच्या महामारीने जगभरात थैमान घातले आहे. आणि याच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा म्हणून प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आबा पेडणेकर यांनी रसिका सिने व्हिजन प्रस्तुत
“दक्षता हीच सुरक्षा” यां वेब मालिकेची निर्मिती केली
आणि याच वेब मालिकेच्या पोस्टरचा अनावरण सोहळा प.पु. सद्गुरू श्री भाऊ महाराज वेल्हाळ यांच्या शुभ आशीर्वादाने साकीनाका, परेरावाडी येथे नुकताच पार पडला. याप्रसंगी निर्माती प्रियांका दत्तात्रय, भास्कर पाटील – उप विभाग प्रमुख चांदीवली तालुका, शिवसेना पक्ष, संजय मुळे – उप विभाग अध्यक्ष, मनसे,
विधान सभा सचिव, प्रेमसिंग बैरागी, वेब
मालिकेचे सह दिग्दर्शक गणेश दत्तात्रेय तळेकर,
राजन काजरोळकर, राजेश नडोने (DOP), राष्ट्रवादी काँग्रेस, विभाग प्रमुख व्यासदेव पवार, हेमंत सुतार, पंकज रेवंडकर, दीपक वेल्हाळ, संजय गोसावी, दिग्दर्शक-पत्रकार महेश्वर तेटांबे, स्वप्नील धुरी, अर्चना तांदळे, वर्षा सावंत, आदी मान्यवर उपस्थित होते. लेखक दिग्दर्शक आबा पेडणेकर यांनी आपल्या संहितेविषयी थोडक्यात माहिती दिली तसेच माजी नगरसेवक ईश्वर तायडे साहेब आणि सोमनाथ सांगळे साहेब यांचं मोलाचे मार्गदर्शन लाभले, प्रसिद्ध अभिनेत्री आणि निवेदिका वीणा शिखरे यांनी आपल्या प्रभावी सुत्रसंचालनाने उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. कोरोना यां महामारीपासून आपला बचाव कसा करायला हवा त्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, त्या अंमलात कशा आणल्या गेल्या पाहिजेत यां सर्व प्रश्नांची उत्तरे “दक्षता हीच सुरक्षा” या वेब मालिकेत नक्की पहायला मिळतील असा विश्वास पेडणेकर यांनी दर्शविला.. आज प्रत्येक ठिकाणी गावागावात, खेड्यापाड्यात, शहरांत, रस्त्यांवर थुंकणारे, मोकाट सिगारेट पिणारे, कचरा कुंडीत न टाकता इतरत्र फेकणारे, नको तेंव्हा हॉर्न वाजवणारे आणि अलीकडचा प्रश्न- बिना मास्क इतरस्त्र फिरणारे अशा अनेक ज्वलंत समस्येवर…प्रश्नांवर प्रकाश टाकणारी वेब मालिका एका सामन्य रिक्षावालीच्या (अर्चना तांदळे) माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा यशस्वी प्रयत्न पेडणेकर यांनी केला आहे. त्यांच्या यां कलाकृतीचे मुंबई सोबत महाराष्ट्रात सर्वत्र कौतुक केले जात आहे.धन्यवाद,महेश्वर,भिकाजी तेटांबे- पत्रकार ९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here