तहसीलदार विजय तळेकर यांची संकल्पना

0

पनवेल/प्रतिनिधी: ग्रामीण भागातील कोविड रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून पनवेल तहसीलद विजय तळेकर प्रथमतःच ग्रामीण भागातील आठ हॉस्पीटलला कोविड दर्जाची परवानगी देवून रूग्ण आणि नातेवाईकांना सुखद धक्का दिला आहे.पनवेलचे तहसील विजय तळेकर यांनी कोविड व्यवस्थेला गती देण्यासाठी ग्रामीण भागात असलेल्या हॉस्पीटलसाठी कोविड दर्जा देवून तिथे रूग्णांवर तातडीने उपचार करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे धास्तावलेल्या कोविड रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठा आधार वाटत आहे.
पनवेलसह रायगडच्या ग्रामीण भागातून शहरी हॉस्पीटलमध्ये कोविड रूग्णांची प्रमाणाबाहेर भर्ती झाल्याने त्यांच्यावरही ताण जाणवत आहे. त्यामुळे साधे बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटरची संख्या कमी पडत आहे. पर्यायाने वैद्यकीय यंत्रणेवर ताण येत असल्याचे लक्षात येताच, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशानुसार तहसीलदार तळेकर यांनी ग्रामीण भागातील आठ हॉस्पीटलला तातडीने परवानगी देवून महापालिका प्रशासनाच्या एक पाऊल पुढे टाकले आहे.
प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, तहसीलदार तळेकर यांनी आज सकाळी ऑक्सिजन वितरक, किरकोळ विक्रेते यांची बैठक घेवून कोणत्याही हॉस्पीटलला ऑक्सिजनचा पुरवठ्याची कमतरता भासू न देण्याच्या सुचना त्यांनी दिलेल्या आहेत.कोणत्या हॉस्पीटलला दिली आहे परवानगी?शिफा हॉस्पीटल ऍण्ढ़ मॅटर्निटी होम ( पारपुंड-कोळखे)बालाजी हॉस्पीटल ( सेक्टर 5, उलवे)
गॅलेक्सी हॉस्पीटल, (सेक्टर 19, उलवे)
मिलेनियम हॉस्पीटल (सेक्टर 19, उलवे)
आयुकेअर हॉस्पीटल (करंजाडे)
बी. एम. एन. हॉस्पीटल (डेरवली)
उलवे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल (उलवे)
लाईफ केअर हॉस्पीटल (विचुंबे)
वहाळ ग्रामस्थांच्या सहकार्याची अपेक्षा
उलवे नोडमधील वहाळ ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास तेेथील एकायन हॉस्पीटलला कोविडची परवानगी मिळू शकते, अशी माहिती हाती आली आहे. तो प्रस्ताव तहसीलदार कार्यालयात प्रलंबित असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here