जिन्सी विशेष पथकाकडुन मोटर सायकल चोरास अटक

0

सिल्लोड : दिनांक : -15/04/2021 प्रेसनोट जिन्सी विशेष पथकाकडुन मोटर सायकल चोरास अटक , दोन गुन्हे उघडकीस दिनांक 15/04/2021 रोजी पो.स्टे.जिन्सी हद्दीमध्ये जिन्सी विशेष पथकाचे . अधिकारी व अंमलदार लॉकडाउनची अंमलबजावणी कामी पो.स्टे हद्दीमध्ये गस्त करीत असतांना मोटर सायकल चोरीमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे शेख जुनेद शेख आरेफ याने चोरीच्या दोन मोटर सायकल असुन मोटर सायकल विक्री करीता ग्राहक शोधत आहे . अशी खात्रीलायक बातमी वरून नमुद आरोपीचा शोध घेतला असता तो रोशन गेट जवळील गिरणी मैदानात असल्याची माहीती मिळाली . त्यावरून पथकाने आरोपीस गिरणी मैदानात जाउन ताब्यात घेतले व चोरीच्या मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता बाजुस असलेल्या गिरणीच्या शेडलगत मोटर सायकल लपवुन ठेवल्या असल्याचे सांगुन दोन मोटर सायकल दाखविल्या . सदर ठिकाणी दोन मोटर सायकल मिळुन आल्या त्यावरून पो.स्टे.जिन्सी येथील गुन्हे अभिलेख तपासले असता गु.र.नं .46 / 2021 कलम 379 भा.द.वि. मधील हिरो HF डिलक्स मो.सा.क्र . MH20DS2880 व गु.र.नं .142 / 2021 कलम 379 भा.द.वि. मधील यामहा मो.सा.क्र . MH20AP3900 प्रमाणे दाखल गुन्हयातील 25,000 / – किंमतीच्या दोन मोटर सायकल आरोपी नामे शेख जुनेद शेख आरेफ वय 20 वर्षे रा.गल्ली नं.सी.सी .15 संजय नगर बायजीपुरा , औरंगाबाद याचे ताब्यातुन जप्त करण्यात आल्या आहेत . सदरची कामगीरी मा.पोलीस आयुक्त सो . , श्री.दिपक गि – हे पोलीस उप आयुक्त परिमंडळ -२ , श्री . निशीकांत भुजबळ सहाय्यक पोलीस आयुक्त सिडको विभाग यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक श्री.आर.के.मयेकर पो.उप नि.विजय जाधव , स.फौ. अय्युब पठाण , स.फौ. संपत राठोड , पो.ना.संजय गावंडे पो.शि.नंदलाल चव्हाण , संतोष बमनात , म.हो. शेख बासीद यांनी केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here