धामणी ते वडाळा या तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: सिल्लोड तालुक्यातील धामणी ते तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून संबंधित विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. तालुक्यातील धामणी या रस्त्याच्या मध्यभागी एक प्राचीन शिवेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्या ठिकाणी दर सोमवारी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. परंतु या रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की या रस्त्याने पायी चालणे सुद्धा अवघड झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे वकडी पडली असल्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्यावर धामणी ते सिद्धेश्वर मंदिर या दोन किलोमीटर रस्त्यावर गेल्या तीन महिन्यापासून खडीचे भिकार पडून असल्यामुळे सुद्धा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे जे खडीचे डिगर पडलेले आहे त्याची खडी रस्त्यावर येऊन छोटे-मोठे अपघात घडत आहेत संबंधित प्रशासनाने तात्काळ या कामाकडे लक्ष देऊन काम सुरू करण्यात यावे अशी मागणी वडाळा शहर धान्य परिसरातील वाहनधारक व नागरिक करत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here