स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विधवा महिला सह गरजू महिलांना आर्थिक मदत

0

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विधवा महिला सह गरजू महिलांना आर्थिक मदत
येवला शहरातील विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत असताना कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स व मास्क लावून १३० व्यां जयतीनिमित अभिवादन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका संघटक राम कोळगे तुळशीराम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक बुद्ध वंदना, भीम स्तुती भीम स्मरण घेण्यात आले यावेळी राजू गायकवाड, संतोष गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले
.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मोठ्या थाटामाटात साजरी होत असते परंतु जगावर कोरोनासारख्या महामारीने थैमान घातले असता बाबासाहेबांच्या विचाराचे पाईक म्हणून आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या कायद्याचे व नियमांचे पालन करणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन होय म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जल्लोषात साजरी न करता होणारा खर्च येथील ग्रामीण भागातील विधवा महिलांचा सह इतर गरजू महिलांना लॉकडाउनच्या काळात आर्थिक मदत म्हणून पाचशे रुपयाच्या चेक सह रोख स्वरूपात मदत वाटप करण्यात आली यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका सचिव शशिकांत जगताप सह आकाश घोडेराव , तुळशीराम जगताप ,संतोष गायकवाड ,राम कोळगे, राजू वाघ ,बाळासाहेब चंदन , मुख्तार तांबोळी,राजू गायकवाड हे अभिवादन करते वेळी उपस्थित राहून यासह चेक वाटप स्वीकारताना संजीवनी गायकवाड , तानुबाई गायकवाड, विमलबाई गायकवाड, इंदुबाई गायकवाड, साखराबई अधिसह महिला उपस्थित होत्या,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here