राष्ट्रवादी युवक कांग्रेस तालुका अध्यक्ष सुनील आहेर यांची धोडी धरण व परिसराची पाहणी

0

देवळा- तालुक्यातील खर्डे येथील धोडी धरण परिसरातील शेतकरी बांधव व नागरिकांनी दि.२८ मार्च रोजी विविध समस्या मांडण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते सदर बैठकीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर हे उपस्थित होते यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विविध समस्या मांडत त्यावर आहेर यांचेशी चर्चा केली त्यात प्रामुख्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली धोडी धरणाची दुरुस्ती, खोलीकरण, धरण परिसर स्वच्छता, सांडव्या लगत बंधारा बांधणे तसेच पावसाळ्यात सांडव्या ला पाणी असल्याने परिसरातील शेतकरी बांधव, आदिवासी वस्तीतील नागरिक यांचा २ ते ३महिने गावांशी संपर्क तुटतो त्यासाठी फरशी पुलाची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी सुनील आहेर यांनी उपस्थित शेतकरी बांधवांची चर्चा करून परिसराची पाहणी करत सामाजिक संस्था, जिल्हा परिषद व लोकसहभाग यातून सदर समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन देत सदर धरणाचा शेती सिंचनासाठी खर्डे परिसरासह वाजगाव, मटाने येथील शेतकऱ्यांनाही फायदा होणार असल्याने सर्वांच्या सहकार्याने काम पूर्ण करण्यात येईल असे ते म्हणाले यावेळी दिलीप पाटील, कारभारी जाधव, मुन्ना जाधव, गोरख देवरे, पत्रकार संजय देवरे, दौलत गांगुर्डे, तुषार जाधव, वामन जाधव, किसान कुवर, शिवाजी जाधव, संजय जाधव, भाऊराव जाधव, राजेंद्र जाधव, विजय जाधव, राजाराम नागू, दशरथ जाधव, शंकर जाधव, वसंत पवार, लालजी जाधव, हरी जाधव, सोमा नाईक, चंद्रकांत देवरे आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here