सैनिकांना मोफत वैद्यकीय सेवा देणारा अवलिया. घाटनांद्रा व परिसरातील सैनिकांच्या परिवारास मोफत वैद्यकीय सेवा

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे: सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील डॉक्टर पती-पत्नी दांपत्य मागील पाच वर्षांपासून भारतीय सैन्यदलाच्या जवानांना व त्यांच्या आई पत्नी मुले यांना मोफत वैद्यकीय सेवा देत आहे घाटनांद्रा येथील डॉक्टर किशोर शिंदे डॉक्टर लता शिंदे हे दांपत्य घाटनांद्रा येथे मागील आठ वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करतात डॉक्टर किशोर शिंदे यांना त्यांच्या आजोबाचा वारसा मिळाला असून त्यांचे आजोबा घाटनांद्रा परिसरामध्ये खेड्या पाड्या वर घोड्यावर जाऊन वैद्यकीय व्यवसाय करायचे ते डॉक्टर शिंदे या नावाने प्रसिद्ध होते त्यानंतर डॉक्टर शिंदे यांचे वडील हे आयुर्वेदाचार्य असून ते गावामध्ये आयुर्वेदिक सेवा पुरवतात एकंदरीत यांच्या घराला वैद्यकीय व्यवसायाची परंपरा लाभल्यामुळे डॉक्टर किशोर शिंदे यांना लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न होते त्यांनी आपले डिग्री औरंगाबाद येथून पूर्ण केले असून गावामध्ये वैद्यकीय सेवा देण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले घाटनांद्रा व परिसरातील भारतीय सैन्यदलात भरती झालेल्या जवानाचे आई-वडील पत्नी व मुले यांना लागणाऱ्या वैद्यकीय सेवा ते त्यांच्या दवाखान्यात मार्फत मोफत देत आहे त्यामुळे आज गावामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते त्यांच्या या उपक्रमाचे गाव व परिसरांमधून मोठे कौतुक होत आहे.
##भारतीय जवान सलमान पठाण यांची प्रतिक्रिया. सलमान पठाणी सीआरपीएफ मध्ये असून त्यांनी यावेळी सांगितले की मी जेव्हापासून भारतीय सैन्य दलात भरती झालो तेव्हापासून डॉक्टर शिंदे आमच्या परिवाराचा मोफत विलाज करतात तो कुठल्याही प्रकारची फी घेत नाही तसेच मी मी ड्युटीवर जरी गेलो तरी माझी आई जरी आली तरी त्यांच्या कडून ते पैसे घेत नाही. **डॉक्टर किशोर शिंदे यांची प्रतिक्रिया. आमचे आजोबा डॉक्टर शिंदे यांच्या  आशीर्वादाने  मी व माझी पत्नी मागील पाच वर्षापासून मी भारतीय सैन्य दलात असलेल्या जवानांच्या परिवारास मोफत वैद्यकीय सेवा देत  आहे आणि इथून पुढेही देतच राहणार .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here