केळगाव येथे शहीद जवान संदिप जाधव यांच्या स्मारकाचे स्फुर्तो स्तंभ बसविण्यात आला

0

सिल्लोड प्रतिनिधी विनोद हिंगमिरे:-सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील रविवार रोजी शहीद जवान संदिप सर्जेराव जाधव यांच्या स्मारकाचे काम झाले असून या मा.श्री,ब्रिगेडीयर एम.एम.विटेकर,15 मराठा एल.आय.(बुर्ज बटालियन) यांच्या हस्ते फीत कापुन तसेच पुप्पहार वाहून करण्यात आले आहे,यावेळी संपुर्ण परीसरातील आढावा घेऊन या गावामधील 3 जवान शहीद झाले असून त्यांच्या कुंटुबाना शासनाकडून अनेक प्रकारचे सुख सोयी उपलब्ध करुन देण्यात येत आहे व तसेच येणार्‍या काळामध्ये या शहीद जवानाच्या पत्नीला कोणत्या प्रकारची शासकीय सेवा पासुन दूर ठेवाला व तसेच त्यांच्या पालांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येईल असे शासकीय विभागा सर्वोतोपरी योजना योजना राबविली जेने करुन वीर जवानाच्या कुंटुबाना कोणत्याही अडचणी येणार नाही असे यावेळी एम.एम.विटेकर यांनी सांगितले.यावेळी शहीद जवान यांच्या आई वडील यांचा यावेळी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात व तसेच शहीद संदिप जाधव यांच्या पत्नी उज्वला जाधव यांना शाल श्रीफळ व तसेच साडी देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला.व तसेच इतर तरुणा स्फुर्ता मिळवी म्हणून शहीद संदिप जाधव यांच्या स्मारकावर स्फुर्ती स्तंभ यावेळी ब्रिगेडीयर विटेकर यांच्या बसविण्यात आला आला सध्या चालु असलेला महा भयंकर बीमारीच्या पार्श्वभुमीवर या कार्यक्रमाला मोजकेच पद अधिकारीच्या यावेळी उपस्थित होती.तसेच यावेळी सिल्लोड येथील यशंवतराव महाविद्यालयाचे ncc च्या विद्यार्थाना सुध्दा या कार्यक्रम सहभाग नोंदविला होता यावेळी शहीद जवान संदिप जाधव यांच्या स्मारकांच्या प्रअंगणात कवायत सादर केली यावेळी यांनी सर्वाचे लक्ष वेधुन घेतले तसेच यावेळी परीसरामधील आजी माजी सैनिक उपस्थित होते. शहीद जवान संदिप जाधव अमर रहे,अमर रहे,संदिप जाधव अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या आहे,यावेळी मा.ब्रिगेडीयर एम.एम.विटेकर,15 मराठा एल.आय.(बुर्ज बटालियन),मुडैश्वर संस्थानचे पिठाधिश ओमकारगिरी महाराज,शहीद जवान वडील सर्जेराव जाधव,पत्नी उज्वला जाधव,भाऊ रविद्र जाधव,अशोक वाघमोडे,सोमनाथ कोल्हे,संतोष जाधव,बाळासाहेब ईवरे,विकास मुळे,दुर्गादास जाधव,चनाआप्पा हिंगमीरे,तसेच गावातील माजी सैनिक यांची सुध्दा उपस्थिती होती. सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील शहीद जवान संदिप जाधव यांच्या मा.ब्रिगेडीयर एम.एम.विटेकर,15 मराठा एल.आय.(बुर्ज बटालियन) यांच्या शुभ हस्ते स्मारकाला रिबेन कापून बंदुक बसवण्यात आली आहे.
शहीद जवान संदिप जाधव यांच्या स्मारकाला श्रध्दांजली वाहताना मा.ब्रिगेडीयर एम.एम.विटेकर,15 मराठा एल.आय.(बुर्ज बटालियन) दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here