श्री.प्रशांत प्रदीप जोशी परिवाराकडुन सत्कर्म बालकाश्रमात अन्नदान,खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप.

0

बदलापुर- प्रतिनिधी महेश्वर तेटांबे होळी सारख्या पवित्र सणाचे औचित्य साधुन तसेच कु.संचित प्रशांत जोशी याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बदलापुर येथील सत्कर्म बालकाश्रमातील मुलांना श्री.प्रशांत प्रदीप जोशी परिवाराकडुन पुरण पोळी सहीत अन्नदान करण्यात आले.तसेच प्रदीप जोशी परिवारानेही जेवणाचा आस्वाद घेतला. तसेच याप्रसंगी श्री.प्रदीप जोशी,सौ.प्रिती जोशी,सौ.मंजिरी जोशी,श्री.प्रशांत जोशी,कु.संचित जोशी,सौ.गंधाली तिरपणकर, जनजागृती सेवा समितीचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांच्या हस्ते मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.प्रशांत प्रदीप जोशी परिवाराने संपुर्ण सत्कर्म बालकाश्रमाची पहाणी केली.व आश्रमाचे संचालक राघवेंद्र देशपांडे व अधिक्षक गेनु कांबळे यांजकडुन माहीती अवगत करुन घेतली.प्रशांत जोशी व कु.संचित जोशी,सौ.मंजिरी जोशी यांनी मुलांसोबत खेळण्याचाही आनंद घेतला.होळी सारख्या पवित्र दिनी सत्कर्म बालकाश्रमात येऊन अन्नदान, शैक्षणिक साहित्य,वाटप केल्याबद्दल जोशी परिवाराने समाधान व कृतज्ञता व्यक्त केली.धन्यवाद
महेश्वर भिकाजी तेटांबे,सिने नाट्य दिग्दर्शक, पत्रकार
९०८२२९३८६७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here