
मुंबई – दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सहकार सेल वर जिल्हाध्यक्ष म्हणून देवेंद्र गणपत मोरे यांची निवड करण्यांत आली. तद्प्रसंगी नवनिर्वाचित सचिव हेमंत दळवी व नवनिर्वाचित दक्षिण मुंबई जिल्हा सहकार सेलचे अध्यक्ष देवरुखकर यांचा सत्कार मुंबई काँग्रेस सहकार सेल चे अध्यक्ष भाई सावंत यांच्या हस्ते करण्यांत आला यावेळी कार्यकारणीतील मान्यवर साहेबरा देशमुख, जिजाबा पवार संचालक मुंबै बँक, श्री.मेहबूबजी, श्री. जाधव, डाॅ. प्रकाश घाग आदि मान्यवर उपस्थित होते.धन्यवाद,महेश्वर तेटांबे,पत्रकार
९०८२२९३८६७
