अजंग येथील नाभिक समाजातील दोघ्या सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: सविस्तर वृत्त असे की अजंग येथील श्री बाळासाहेब दत्तू जाधव (सर )यांची दोघे मुलं कु. हर्षल वय वर्षे 22 रितेश वय वर्षे 18 हे निमशेवडी येथे मित्राच्या लग्नात हजेरी लावून बोरी डॅम येथे फिरण्यास गेले त्यांच्यासोबत यांचा चुलत भाऊ कु. भावेश भगवान जाधव राहणार अजंग होता हे फोटो शूट करत असताना अचानक हवेच्या जोराने त्यांचा तोल पाण्याच्या दिशेने गेला व जागीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती वडनेर पोलीस स्टेशन येथील पोलिस कर्मचारी यांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन घटनेची दखल घेतली.त्यावेळी अजंग येथील उपसरपंच श्री गोकुळ बाळू सूर्यवंशी व राजगड सामाजिक प्रतिष्ठान चे कार्यकर्ते श्री राहुल पवार यांनी घटनास्थळी उपस्थित होऊन दोघा तरुणांचे शव बाहेर काढले व मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here