प्रेरणा फाउंडेशन महाराष्ट्र च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त महिला रिक्षा चालकांचा सत्कार

0

मुंबई – प्रेरणा फाउंडेशन रजि. 564/एफ38784/बदलापूर/ठाणे/महाराष्ट्र या सामाजिक संस्थेने 23 मार्च 2021 मंगळवार रोजी प्रेरणा फाउंडेशन च्या तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रेरणा फाउंडेशन तर्फे महिला रिक्षा चालकांचा राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सोहळा दुपारी 3 ते 5 वाजता श्री. एन. जी. विद्यालय, बॅरेज रोड, समर्थनगर, बदलापूर (प). महाराष्ट्र 421503 येथे धुमधडाक्यात साजरा झाला.या कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर यांनी सचिव वैभव कुलकर्णी व उपखजिनदार दिव्या गांवकर यांच्या सहकार्याने आयोजित केला. सहसहकार्य श्री. एन. जी.विद्यालय च्या संचालिका सौ. मनीषा घाटगे चौगले यांनी कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून बहुमोलाचे सहकार्य केले. तसेच कवयत्री सौ. वैशाली विनायक चांदेकर यांनी अल्पपोउपहाराचे बहुमोलाचे सहकार्य केले.
प्रेरणा फाउंडेशन हे एक सामाजिक संस्था असून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. हे फाऊंडेशन गेले तीन वर्ष सतत गोर गरीब लोकांना, रस्त्यावरील भटकी लोकांना, अनाथांना आधार देण्याचे काम करते. अनेक आदिवासी पाडे सुधारणे, आदिवासी गावाला रस्ता, वीज, पाणी व लाईट याची सोय, नदया, चौपाटी, एस टी डेपो, रेल्वे स्टेशन,रस्ते, ठिकठिकाणी स्वछता अभियान राबविणे, अनेक अनाथालय, वृद्धाश्रम, अनाथ रस्त्यावरील भटकी मुले यांना सहारा व सहकार्य देण्याचे काम करते. व तसेच प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ व प्रेरणा युट्युब अंतर्गत दिग्दर्शिका/ नाटककार दीप्ती (प्रेरणा) गांवकर ह्या कॅन्सरग्रस्त लोकांना आधार देण्याचे काम करतात.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. श्री. अविनाश म्हात्रे (अध्यक्ष दीनदयाल कुष्ठरोग संस्था), मा. इंदुताई घाटगे (श्री. एन. जी विद्यालय संस्थापिका), मा. मनीषा घाटगे चौगले (श्री. एन. जी. विद्यालय संचालिका), मा. श्री. मंगेश सावंत (समादेशक कमांडींग ऑफीसार), मा. श्री. बळीराम काथोड पाटील (भिवंडी, संस्थपाक, कर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट, गीतकार, कवी, कृषिमित्र), मा. सौ. वैशाली विनायक चांदेकर (मुख्याध्यापिका, कवयत्री), मा. कु. शैलेश सणस (उपसंपादक, रोशनी न्यूज चॅनल) या सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका/अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर व कमिटीच्या हस्ते करण्यात आला. प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते, स्वतः च्या मेहनती वरती स्वकष्ठाने घर चालवून घराचे आधार स्तंभ बनणाऱ्या रिक्षा चालक महिलांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रेरणा युट्युब प्रोडक्शन महाराष्ट्र चॅनल माध्यमातून अनेक मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रेरणा फाउंडेशन उपखजिनदार कु. दिव्या गांवकर यांनी सूत्र संचालन अगदी जबाबदारी पूर्वक निभावले. प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर व पदाधिकाऱ्यांनी मिळून सर्व मान्यवर व रिक्षा चालक महिलांची मुलाखत घेऊन समाजासाठी हे कसे आधार स्तंभ ठरले आहे याबाबत जाणून घेतले. प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका/ अध्यक्षा दीप्ती (प्रेरणा) गांवकर यांनी प्रेरणा फाउंडेशन या छोटयाश्या रोपट्याचे आज कल्पवृक्ष कसे झाले याची माहिती व मागदर्शन केले. व तसेच सर्व प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या दोन शब्दात सर्व पुरस्कार्थीना मार्गदर्शन केले सर्व सन्मानित अतिथीतींचे कार्य मुलाखतीत ऐकताना डोळ्यात पाणी उभे राहिले व कारण त्याचा संघर्ष व त्यांना मिळालेले यश हे त्याच्या मेहनतीची पोहच पावती होती. मा .अविनाश म्हात्रे,
मा. मंगेश सावंत, मा. वैशाली चांदेकर, मा. बळीराम पाटील मा. मनीषा घाटगे चोगले, मा. इंदुताई घाडगे. मा. शैलेश सणस या सर्वानी या कार्यक्रमाच्या वेळी सर्व हिरकणीना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास खजिनदार गुरुनाथ तिरपणकर, सभासद गंधाली तिरपणकर,आरती तांबे उपस्तिथ होते. सहसचिव दिलेश देसाई, सभासद रेशमा देसाई, यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.तसेच अजय जोशी यांनी प्रेरणा फाउंडेशन तृतीय वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची सुबक आणि सुंदर व्हिडिओ शूटिंग केली. कु. दिव्या गांवकर यांनी सर्वांचे आभार मानले व अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here