पत्रकार लक्ष्मण राजे यांना फन टू लर्न संस्थेच्या सीईओ रचना भीमरजका यांच्या हस्ते “हि प्राइड अवार्ड” प्रदान

0

मुंबई:- फन 2 लर्न या संस्थेने आयोजित केलेल्या विशेष व्हर्च्युअल कार्यक्रमात जगभरातील विविध क्षेत्रातील सीईओ, चेअरमन, डायरेक्टर, अर्थतज्ज्ञ, राजकीय विश्लेषक, डाॅक्टर, इंजिनिअर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते संपादक, यांच्यासह पत्रकार लक्ष्मण राजे यांना फन 2 लर्न या संस्थेच्या वतीने सीईओ रचना भीमरजका यांच्या हस्ते मानाचा “हि प्राइड अवार्ड” प्रदान करण्यात आला. विशेषत: पत्रकार लक्ष्मण राजे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात आजवर दिलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा करताना त्यांना फन 2 लर्न या संस्थेच्या वतीने दखल घेऊन सन्मानित करण्यात आले आहे असे सीईओ रचना भीमरजका यांनी सांगितले.तसेच या कार्यक्रमात मेजर जनरल विक्रम डोगरा, डॉ कुलभूषण शर्मा, डॉ. प्रियादर्शी नायक,श्री अनिरुद्ध गुप्ता, श्री अमित कुमार , श्री अमोल अरोरा, डॉ अजय सहाय आणि इतर मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.या संस्थेच्या सीईओ रचना भीमरजका यांनी वर्चुअल पद्धतीने आयोजित केलेला हा कार्यक्रम ग्लोबल एज्युकेटर्स फरटेरनिटी , पानबाय इंटरनॅशनल स्कूल, आणि जी ए एन जी एस स्कूल या संस्थांनी पुरस्कृत केला होता.याप्रसंगी फन टू लर्न या संस्थेच्या माध्यमातून आजवर संस्थेच्या सर्वोसर्वा माननीय सीईओ रचना भीमरजका यांनी एक लाख पंचवीस हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे.अशा शैक्षणिक क्षेत्रातील फन 2 लर्न या एका मोठ्या संस्थेच्या कार्यक्रमात मला “हि प्राइड अवार्ड” प्रदान करून सन्मानित करण्यात आले त्याबद्दल मी फन 2 लर्न या संस्थेच्या प्रमुखांचे आणि सर्व मान्यवरांचे आभार मानतो असे पत्रकार लक्ष्मण राजे यांनी मनोगत व्यक्त केले.”हि प्राइड अवार्ड” प्राप्त केल्याबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य आणि कला, पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तसेच समाजातील सर्व स्तरातील लोकांनी पत्रकार लक्ष्मण राजे यांना मनःपुर्वक अभिनंदनीय हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पत्रकारिता क्षेत्रातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here