शेतकरी बांधवांना बाजार समितीत शेतमाल घेऊन जाणे सुलभ- सुनीलआहेर

0

देवळा- तालुक्यातील वाजगाव ते मटाने या रस्त्याचा दुरुस्ती कामाचा शुभारंभ दि.२४ मार्च रोजी वाजगाव येथे गटाच्या जि. प. सदस्या सौ नूतनताई सुनील आहेर यांच्या हस्ते पार पडला यावेळी पंचायत समिती सभापती श्रीमती शांताबाई पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील (गोटूआबा) आहेर उपस्थित होते. यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष आहेर म्हणाले की परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांची प्रलंबित मागणी या रस्ते कामाच्या शुभारंभा निमित्ताने आज पूर्ण होत आहे परिसरातील खर्डे, वाजगाव, शेरी, वार्षि, कनकापूर येथील शेतकरी बांधवांना आपला शेतमाल देवळा बाजार समितीत घेऊन जाण्यासाठी अत्यंत सोयीचा व जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर होतो सदर रस्त्याचे काम सुरू झाल्याने शेतकरी बांधवांना आपला शेतमाल बाजार समितीत घेऊन जाणे सुलभ होणार आहे यावेळी बळीराम देवरे, महेंद्र देवरे, सुनील देवरे, अशोक देवरे, जगन्नाथ देवरे, सोसायटी चेअरमन रामचंद्र गवळी, रामदास देवरे,दिलीप आहेर, ग्रा. पं. सदस्य समाधान केदारे, मुन्ना जाधव, रवींद्र केदारे, समीर आहेर, शैलेंद्र देवरे, विलास पवार, दौलत गांगुर्डे, गोरख जाधव, किशोर खरोटे, ललित निकम, पत्रकार संजय देवरे, प्रेमानंद देवरे, ग्राम विस्तार अधिकारी जिभाऊ देवरे, अनिल आहेर आदी नागरिक व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here