महेश्वर तेटांबे यांना धायटी, सांगोला येथे आदर्श सेवा सन्मान पुरस्कार

0

मुंबई – पत्रकार महेश्वर भिकाजी तेटांबे यांना लोकप्रिय दैनिक तुफान क्रांतीच्या तृतीय वर्धापनादिना निमित सोलापूर, सांगोला धायटी येथील जिजामाता मल्टिपर्पज सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते नुकताच आदर्श सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी दै. तुफान क्रांतीचे संपादक मिर्झा गालिब मुजावर, फैजुन मुजावर, रज्जाक मुजावर, नायब तहसीलदार सुधाकर मागाडे, पत्रकार राहुल खरात आदी मान्यवर उपस्थित होते. महेश्वर तेटांबे यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव व्हावा त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची वाटचाल वृद्धिंगत व्हावी यां सामाजिक भावनेने दै. तुफान क्रांती निवड समितीने त्यांच्या सामाजिक कार्याची योग्य ती दखल घेऊन त्यांची आदर्श सेवा सन्मान पुरस्कार म्हणुन अचूक निवड केली. तेटांबे यांना आतापर्यंत पत्ररत्न, पत्रमहर्षी, पत्रविभूषण, जाग्रुत पत्रलेखक, समाजरत्न, समाजभूषण असे एकापेक्षा अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आपल्या पत्रकारीतेबरोबर त्यांनी चित्रपट क्षेत्रांत देखील आपला ठसा उमटविला आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे. ई टीव्ही वरील क्राइम डायरी यां लोकप्रिय मालिकेत त्यांनी ५०० हून अधिक एपिसोड्स मध्ये अभिनय केलेला आहे. त्याचबरोबर ते स्वतः सिने नाट्य दिग्दर्शक आहेत त्यांनी आतापर्यंत बऱ्याच वेबसीरीजचे दिग्दर्शन तसेच आस, अर्थ स्वार्थ, शिदोरी, ७७७ रुपयांत बाबा.. अशा अनेक लघु चित्रपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले आहे. त्यांच्या काही लघु चित्रपटांना पुरस्कार देखील मिळालेले आहेत. सध्या तेटांबे यांचा त्यांच्याच पुरस्कार यां प्रसिद्ध एकांकिकेवर आधारीत मराठी सिनेमा बनविण्याचा त्यांचा मानस आहे.धन्यवाद,गुरुनाथ तिरपणकर
पत्रकार,८८७९८१०२९८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here