सिद्धी कामथ यांना सांगोला येथे आदर्श सेवा सन्मान पुरस्कार

0

मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी विनायक कामथ यांना लोकप्रिय दैनिक तुफान क्रांती च्या वर्धापनादिना निमित सांगोला येथील जिजामाता मल्टिपर्पज हॉल मध्ये नुकताच आदर्श सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी दै. तुफान क्रांतीचे संपादक मिर्झा गालिब मुजावर, फैजुन मुजावर,रज्जाक मुजावर,नायब तहसीलदार सुधाकर मागाडे,पत्रकार राहुल खरात आदी मान्यवर उपस्थित होते. दै. तुफान क्रांती निवड समितीने
सिद्धी कामथ यांनी आतापर्यंत केलेल्या प्रशंसनीय कार्याची योग्य ती दखल घेऊन त्यांचा गौरव म्हणुन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सिद्धी कामथ यांनी आतापर्यंत बऱ्याच मालिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविलेली आहे. त्यांनी साकारलेल्या बाळूमामाच्या नावानं चांगभलं यां लोकप्रिय मालिकेतील लक्ष्मीची सासू ही भूमिका विशेष गाजली. त्यांच्या फुलाला सुगंध मातीचा यां मालिकेतील अभिनयाचे देखील विशेष कौतुक केले जात आहे. सिद्धी कामथ यांनी अभिनयाबरोबर समाजसेवेची आवड सुद्धा जोपासली आहे. त्याचे फलित म्हणुन त्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या तक्रार निवारण प्रमुख पदी, कल्याणी बहुउद्देशीय संस्थेच्या सांस्कृतिक विभागात महाराष्ट्र उपाध्यक्षा, भारतीय महाक्रांती सेनाच्या प्रमुख प्रवक्त्या तसेच मानवाधिकार समिती च्या महाराष्ट्र सचिव म्हणुन आपली धुरा सांभाळत आहेत. त्यांना मिळालेल्या आदर्श सेवा सन्मानाबद्दल संपुर्ण महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होत आहे.धन्यवाद,राहुल खरात
पत्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here