पीआय इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीने स्टीवर्डशिप डे साजरा

0

वासोळ प्रतिनिधी प्रशांत गिरासे: भारतातील अग्रगण्य कंपनी पी आय इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या कृषी व्यवसायाच्या प्रमुख कार्यक्रमांतर्गत आणि उत्पादनाच्या प्रसिद्धीला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नातुन स्टीवर्डशिप दिन नुकताच साजरा केला.या कार्यक्रम नामपूर (ता. बागलाण) येथील बैठक हाॅटेलला आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला शासन नियमानुसार परिसरातील सुमारे ५० शेतकरी मास्क लावून उपस्थित होते. तसेच कृषी अधिकारी, सरपंच, बलभीम बिरादर, प्रकाश शेवाळे नीरज अहिरराव उपस्थित होते. कंपनीचे अधिकारी संजय पाटील यांनी शेतकर्‍यांना संबोधित केले आणि विविध संप्रेषण साधनांचा वापर करून “कीटकनाशकांचा सुरक्षित आणि न्याय्य वापर” याबद्दल जागरूक केले. योग्य वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई) वापरण्यावर विशेष भर दिला गेला.
या प्रसंगी शेतकरी दादा चव्हाण, बबलू अहिरे, बाळा चव्हाण, संदीप खैरणार, धनंजय अहिरे, संजय खैरणार, अजय अहिरे, सचिन भामरे, अनिल भामरे आदी उपस्थित होते. P

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here